अकोला : अकोल्यात दोन गट भिडले; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटनेत 6 जखमी, 1 गंभीरजिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या हातरुण गावात एकाच समाजाच्या दोन गटात मोठा क्षुल्लक कारणावरून वाद उफाळला. वादानंतर दोन्ही गट आमने-सामने येऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. संतप्त जमावाकडून यावेळी एक चारचाकी वाहन पेटवण्यात आले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर, दोन्ही गटातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दुर्घनटेनंतर सहा जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून हातरून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून एक गट दुसऱ्यावर गटावर धावून गेल्यानंतर ही घटना घडली. पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला
त्यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर हातरून गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही गटाला शांत करण्यात पोलीस व स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.