पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू

पुणे – शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेत हेल्मेट घातले नसल्याने डोक्‍याला जबर मार लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुचाकी घसरुण हॅण्डल डोक्‍यात घुसला

धायरी येथे झालेल्या अपघातात नऱ्हे येथे रहाणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा 8 सप्टेंबर रोजी भरधाव वेगात दुचाकी घेऊन उंबऱ्या गणपती चौकातून धायरी फाट्याकडे चालला होता. यावेळी त्याची दुचाकी घसरुन तीचे हॅण्डल त्याच्या डोक्‍यास लागले. डोक्‍यास मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाची नोंद सिंहगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू 

भरधाव डंपर इंडिकेटर न दाखवता अचानक वळल्याने बुलेटवर मागे बसलेली तरुणी डंपरच्या चाकाखाली सापडली. यामध्ये डोक्‍यास जबर मार लागल्याने तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी पुणे-सोलापूर रस्त्यावर काळूबाई चौकात घडली.

डंपर चालक विकास भिकु गुजर(27,रा.भेकराईनगर) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. निरजा संजय जानराव(24,रा.केसनंद फाटा, वाघोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. फिर्यादी शुभम खेमकर(24,रा.भवानी पेठ ) हा निरजाला बुलेटवर मागे बसवून हडपसर शेवकर वस्तीमार्गे गोळीबार मैदानाकडे चालला होता. यावेळी चौकातील सिग्नलला उजव्या बाजुने आलेल्या डंपर चालकाने इंडिकेटरन न देता अचानक डाव्या बाजूस डंपर वळवला. यावेळी डंपरच्या पुढील चाकाच्या एयर टाकीजवळील सेफ्टी लोखंडी गार्डमध्ये शुभच्या बुलेटचा हॅंण्डल अडकला. यामुळे शुभम आणी निरजा डंपरच्या खाली पडले. यामध्ये निरजाच्या डोक्‍याला तर शुभमच्या डाव्या हाताला घासून डंपरचे चाक गेले.

निरजाने डेल्मेट घातले नसल्याने तीचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला. शुभम व निरजा पुर्वी एकाच कंपनीत काम करत होते. गोळीबार मैदान येथे एका कार्यालयात तीचे काम असल्याने ते दोघे दुचाकीवरुन चालले होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.