पुणे – ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी दोन करोनाबाधितांचा मागील 24 तासांत मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृतांची एकूण संख्या 33 वर गेली आहे.
शहरात सोमवारी एका दिवसात 33 नवे करोनाबाधित आढळले. त्याचंबरोबर मृतांची संख्याही वाढत असल्यामुळे शहरात भितीचे वातावरण आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत एकूण चौघांचा करोनाने बळी घेतला.
सोमवारी (दि.13) दिवसभरात ससून रुग्णालयातील 40 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये महिलेला दि. 9 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांना लठ्ठपणा आणि मूत्रपिंडाचा आजार होता.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा