मध्यप्रदेश विषारी दारुप्रकरणी दोन हवालदारांना अटक

Madhuvan

उज्जैन  – मध्यप्रदेशातील विषारी दारू दुर्घटना प्रकरणी उज्जैन जिल्हा पोलीस अधिक्षक आणि अन्य एका पोलीस अधिकाऱ्याची भोपाळला बदली करण्यात आली असून या विषारी दारूच्या विक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन हवालदारांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विषारी दारूच्या सेवनामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या निवासस्थानी एका बैठकीमध्ये या घटनओचा आढावा घेतल्यानंतर उज्जैन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज सिंग आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक रूपेश द्विवेदी यांच्या बदलीचे आदेश दिले.

विषारी दारूच्या विक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाबद्दल उज्जैनमधील दोन हवालदारांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. याशिवाय उज्जैनमधील एका डॉक्‍टरसह अन्य एकालाही अटक करण्यात आली आहे.

विषारी दारूचे सेवन केल्याबद्दल बुधवारी आणि गुरूवारी 12 जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू होणाऱ्यांमध्ये बहुतेक भिकाऱ्यांचा समवेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.