सोलापूर : महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही आपला फोन टॅप केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. भाजप सत्तेत असताना त्यांनी विरोधकांचे फोन टॅप केले. फोन टॅप प्रकरणी चैकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
तसेच काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केले जात आहे. समोरासमोर उभं राहुन त्यांना सामना करता येत नाही म्हणून भाजप पाठीत खंजीर खुपसत’ असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधांनी एका मुलीवर स्नुपिंग केले होते. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही अशा प्रकारचा आरोप केला होता. गृहमंत्रालयाने प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहे.