काबूल – अफगाणिस्तानातील काला-ए-नाव शहरात रविवारी एका दुकानात झालेल्या बॉम्ब स्फोटात दोन जण ठार तर दोन जखमी झाले. हे शहर बदघीस प्रांताच्या मध्यभागी आहे. प्रांतीय कार्यवाहक पोलीस प्रमुख शिर अका आलोकोझई यांनी या स्फोटाबद्दल टोला न्यूज या स्थानिक वृत्त वाहिनीला माहिती दिली आहे.
Two civilians killed & two others wounded in a bomb blast at a shop in Qala-e-Naw city, the center of Badghis province, provincial acting Police Chief, Shir Aqa Alokozai said: TOLOnews #Afghanistan
— ANI (@ANI) November 8, 2020
दरम्यान, शनिवारी अफगाणिस्तानच्या जाबुल येथे झालेल्या स्फोटात सात जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानमधील घटना ही देशातील काही पहिलीच घटना नाही. याआधीही अफगाणिस्तानात स्फोट झाल्याचे वृत्त सातत्याने येत आहे. यापूर्वी काबूलच्या फुल-ई-खोस्क भागात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक लोक ठार झाले होते.