#CWC19 : दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन तर श्रीलंकेच्या संघात एक बदल

चेस्टरलेस्ट्रीट – इंग्लंडचा धुव्वा उडविणाऱ्या श्रीलंकेला स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत सपशेल निराशा केली असून त्यांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाप ड्यु प्लेसिस याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संघात दोन बदल केलेले आहेत. डेव्हिड मिलर आणि लुंगी एन्गिडी यांना वगळून जेपी ड्युमिनी आणि ड्वेन प्रिटोरस यांना संधी देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे श्रीलंकेच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. नुवान प्रदीप ऐवजी सुरंगा लकमल याला संघात स्थान देण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.