शहीद जवान औरंगजेब यांचे दोन भाऊ लष्करात दाखल

नवी दिल्ली – गेल्या वर्षी जम्मूच्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या औरंगजेब यांचे दोन भाऊ मोहम्मद तारीफ आणि मोहम्मद शब्बीर यांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला आहे. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी लष्करात प्रवेश केला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया माध्यमांना दिली.


दरम्यान, गतवर्षी जम्मू-काश्मीरच्या पूछ सेक्टरमध्ये राहणारे जवान औरंगजेब 23 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. सुट्टीसाठी ते घरी आले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर गुरूवारी पुलवामा जिल्ह्यातील गुसु गावात त्यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी कुटुंबीयांनी या हत्येचा बदला घेण्याची मागणी केली आहे. ”मोदीजी, भावाच्या बदल्यात आम्हाला शंभर दहशतवाद्यांचा खात्मा पाहिजे, हे काम तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. आम्हाला सगळं माहित आहे. पण आम्ही सरकारच्या ताब्यात आहोत, तर सरकारकडे ही मागणी आहे, असं औरंगजेब यांचा भाऊ म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)