दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू

शिरूर – बाभूळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी करोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पूर्व भागातील अनेक गावांनी, वाड्या वस्त्यांवर याचा प्रादुर्भाव होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

बाभूळसर बुद्रुक येथील विठ्ठल भगवान नागवडे (वय 56) व त्यांचे लहान भाऊ सुभाष भगवान नागवडे (वय 53) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. यातील दोन्ही भावांना वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 13) नागवडे कुटुंबातील विठ्ठल यांचा उपचार सुरू असतानाच केडगाव येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच विठ्ठल यांचे लहान भाऊ सुभाष नागवडे यांचाही मांडवगण फराटा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. दुर्दैवी निधन झालेल्या विठ्ठल व सुभाष यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, मुले, मुली, सुना असा परिवार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.