धुळ्यातील अपघातात दोन भावांचा मृत्यू

साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाशी समोरासमोर धडक

धुळे: साक्री पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ आमदार अहिरे यांची इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघा भावांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारी घडली. यात सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेत आमदार डी. एस. अहिरे हे जखमी झाल्याचीही माहिती आहे.

साक्री तालुक्‍यातील मलांजण येथील सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे दुचाकीवरून साक्री गावाकडे येत होते. धाडणे फाट्याजवळ समोरासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेले. यावेळी त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको केला. साक्री विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे देखील जखमी झाले आहेत. हा अपघात आमदाराच्या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.