पुणे : सहकारनगर पोलिस स्टेशन हद्दीत रविवारी रात्री दहाच्या सुमारास एक कार सह दोन रिक्षांची तोड फोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सिसिटिव्ही च्या आधारे दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
धनकवडी आंबेगाव पठार येथील नवनाथ नगर परिसरात हि घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे.
गाड्यांच्या तोडफोडीचे कारण अजून ही स्पष्ट झाले नाही. मात्र पुर्व वैमनस्यातून किंवा वर्चस्व वादातून हि घटना घडली असल्याची शक्यता असून रात्री उशिरा पर्यंत तपास सुरू होता.