महाबळेश्‍वरमधील दोघांना अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी अटक

पाचगणी  -एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय 30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय 22, रा. मुनावळे हाऊसिंग सोसायटी, महाबळेश्‍वर) यांना महाबळेश्‍वर पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेत पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिची नुकतीच प्रसूती झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयितांनी पीडित मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

यामध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली. काही दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाली. पोलीस उपअधीक्षक शीतल खराडे-जानवे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी संशयितांवर महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिद्री तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.