‘माय लॅब’चे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील दोघांना अटक

पुणे – विविध आजारांचे निदान करणार्‍या माय लॅब या कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले  बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक  करण्यात आल्याचे  उघडकीस आले असून या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरात येथील दोघांना अटक केली आहे.

संस्कार संस्कृत उर्फ रुषी (वय १९) आणि प्रशांत सिंग ऊर्फ गुट्टू  (वय २४, दोघेही रा. जामनगर, गुजरात) ही संशयित आरोपींची  नावे आहेत. त्यांचा साथीदार  भावेश पासवान याच्याविरुद्धही  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपासासाठी त्यांना येत्या २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

चेतन सोनराज रावळ (वय ३४, रा. बाणेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १९ जुलै २०२१ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने ही फसवणूक झाली. आरोपींनी  या  कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करून त्या सारखे हे नवीन डोमेन तयार केले. त्याद्वारे त्यांनी बनावट सेल्स ऑर्डर तयार केली.

तसेच आरोपींनी एक बनावट फेसबुक पेज तयार करून त्यामार्फत फिर्यादीची कंपनी ही करोनाच्या चाचणी किट प्रॉडक्ट विकणारी असल्याचे भासवून ईमेल, बँक खाती, फोन नंबर द्वारे लोकांची फसवणूक केली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण याप्रकरणी तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.