मुंबई – फोन कॉल्सचे डिटेल्स व बॅंक खात्यांचा तपशील बेकायदेशीरपणे मिळवून तो दोनशे जणांना विकल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गोरेगावातील दोन जणांना अटक केली आहे. शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साऊ अशी त्यांची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि कॉल डिटेल रेकॉर्ड जप्त केले आहे.
तीन लॅपटॉप आणि आयपॅडही जप्त करण्यात आले आहे. कोणत्याहीं व्यक्तीचा फोन कॉल्सचा डाटा किंवा बॅंक खात्यांचा तपशील कोणालाहीं मिळवता येत नाही. त्यासाठी त्यांना रितसर अनुमती घ्यावी लागते. पण तंत्रज्ञानाचा वापर करून हे दोन जण कोणाच्याही कॉल डिटेल्सची माहिती मिळवत असत आणि ते संबंधीतांना विकत असत. हे आरोपी स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवून घेत होते व त्या आधारे ते लोकांना हीं माहिती विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.