मुंबई – सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या दोघा आरोपींना मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. २६ ऑगस्टला हा संपूर्ण प्रकार घडला आहे. सोशल मिडियावर या मुलांची तिच्यासोबत ओळख झाली होती. कालांतराने हे दोघे पिडीत मुलीला आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकत होते.
अखेर मुलीने त्रासाला कंटाळून याबाबत आई-वडिलांना घटना सांगितली. त्यानंतर मेघवाडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.