नोकरीच्या आमिषाने तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर अध्यक्षावर गुन्हा दाखल

सोलापूर: नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 2 लाख 65 हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण भारत चव्हाण असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सोलापुरातील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित तरुणाकडून 2 लाख 65 हजार उकळल्या प्रकरणी धम्मपाल माशाळकर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे धम्मपाल माशाळकर यांनी विद्यापीठाच्या मुलाखतीसाठी बनावट पत्र दिल्याचा आरोप फसवणूक झालेल्या तरुणाने केला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील रानमसले येथील किरण भारत चव्हाण या तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात लिपिक आणि शिपाई पदासाठी जागा निघाल्या आहेत, असे सांगण्यात आले. विद्यापीठातील कुलसचिव सोनजे हे माझ्या परिचयाचे आहेत. तिथे तुला नोकरी लावतो. लिपिकाच्या जागेसाठी 5 लाख रुपयांचा रेट सुरू आहे. यातील अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील, असे सांगून किरण चव्हाण यांच्याकडून े2 लाख 65 हजार रुपये उकळले.

धम्मपाल माशाळकर यांनी मुलाखतीसाठी विद्यापीठाच्या नावे बनावट मुलाखत पत्र पाठवले. मात्र किरण याने विद्यापीठात जाऊन याबाबत शहानिशा केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर किरण यांनी थेट पोलिसात धाव घेऊन धम्मपाल माशाळकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केला. किरण यांच्या तक्रारीनुसार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 417 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.