पुणे – पत्रकार असल्याचे सांगत गुटखा व्यापाऱ्याकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या सहाजणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक क्रेटा गाडी, रोख अडीच लाख हस्तगत करण्यात आले. तर अवैध्यपणे गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी संबंधीत व्यापाऱ्यावरही गुन्हा दाखल करत 98 हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला.
विनोद अंबादास साळुके (45,रा.कात्रज,पुणे ) प्रविण बाजीराव झेंडे(27 ,रा.जिजामाता चौक,आंबेगाव पठार,पुणे ) प्रमोद भानुदास घोणे (26,रा.धनकवडी,पुणे ) सोमनाथ यशवंत भडावळे (33,रा,धनकवडी,पुणे ) बबन अंबादास साळुके (44,रा.फालेनगर,कात्रज,पुणे ) परमेश्वर अभिमान यमगर (35,रा.फालेनगर,कात्रज ) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.26 ऑक्टोबर रोजी वरिषंठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना खबर मिळाली की, मौजे उरुळीदेवाची गावचे हददीत बाजारेमळा येथे अबु शेख (रा.मार्केटयार्ड पुण)े यांने अवैध्द गुटखा साठा केला. त्याबाबत स्वत:ला पत्रकार म्हणवणाऱ्या प्रविण झेंडे याने अबु शेख याचेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. आहे. खंडणीची रक्कम घेण्यासाठी तो उरळीकांचण येथे येणार आहेत,अशी बातमी मिळाली.
त्यानूसार राजेंद्र मोकाशी यांनी उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना मिळालेल्या बातमिची खातरजमा करुन कारवाई करणेबाबत करण्यास सांगितले. त्यानूसार स्मशानभुमिजवळ पोलीस सापळा रचुन दबा धरुन थांबले होते. त्यांना पायी चालत आलेल्या व्यक्तीने क्रेटा गाडीमधुन आलेल्यांना रक्कम दिल्याचे दिसले. पथक जवळ जाताच आरोपींनी अंधारात पळ काढला. मात्र त्यांना थोड्याच अंतरावर पकडण्यात आले.
सदरची उल्लेखनीय कामगीरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, प्रमोद हंबीर , चालक शंकर नेवसे, पोलीस अंमलदार अभिजीत टिळेकर,हेमंत कामथे, सत्यवान चव्हाण व दिपक सोनवणे यांचे पथकाने केली.