सातारा – सैदापूर, ता. सातारा येथील रयत कॉलनी परिसरातील दिलीपकुमार विष्णू माने यांचा बंगला फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माने हे मंगळवारी (दि. 16) सायंकाळी सात वाजता बंगल्याला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते बुधवारी (दि. 17) सकाळी आठ वाजता परत आल्यावर घरफोडी झाल्याचे लक्षात आले.
चोरट्यांनी तीन तोळ्यांचा नेकलेस, एक तोळ्याच्या दोन साखळ्या, एक तोळ्याच्या चार रिंगा, एक तोळ्याचा बदाम, चांदीची सहा नाणी, असा ऐवज लंपास केला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी बंगल्याची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील तपास करत आहेत.