लबाडी जगासमोर… पालिकेमुळे बचावले रुग्णाचे अडीच कोटी रुपये

खासगी हॉस्पिटलने केली होती जादा आकारणी

पुणे – करोना काळात खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या वाढीव बिलांची तपासणी पालिकेने केल्यामुळे रुग्णांचे जवळपास 2 कोटी 54 लाख 51 हजार रुपये वाचले आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने दिड लाखांपेक्षा अधिक बील आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी केली होती. त्यातून ही बाब समोर आली आहे.

 

करोना रुग्णांसाठी महापालिकेकडून शहरातील 711 खासगी रुग्णालयांपैकी सुमारे 84 रुग्णालयांचे बेड ताब्यात घेण्यात आले होते. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बील आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्यशासनाने दिड लाखांपेक्षा अधिक बील आकारणाऱ्या रुग्णालयांच्या बिलांच्या तपासणीचे आदेश महापालिकेस दिले होते.

 

त्यानुसार, पालिकेने या हॉस्पिटलसाठी सुमारे 50 बील तपासणीस नेमले होते. त्यांनी, आतापर्यंत सुमारे 920 बिलांची तपासणी केली असून 608 बिलांमध्ये वाढीव दराने शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. या 920 बिलांची एकूण रक्कम सुमारे 14 कोटी 71 लाख 4 हजार होती. त्यातून सुमारे 2 कोटी 54 लाखांचे बील कमी करण्यात आले आहे.

 

तर ज्या रुग्णालयांनी आधी जादा बिल आकारले होते. त्यांना ही वाढीव रक्कम रुग्णांना परत देण्यासही भाग पाडले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.