अलास्का – अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. वृतसंस्थेंच्या वृत्तानुसार, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
The Associated Press: The Coast Guard says six people are unaccounted for after two floatplanes went down in the water in southeast Alaska, US.
— ANI (@ANI) May 14, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरात हा अपघात झाला. दोन विमानाची हवेत टक्कर झाली. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. ही दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी होती. प्रवाशांना घेऊन जाताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण अद्याप बेपत्ता आहे.