कोळपेवाडीतील सराफावरील दरोड्यातील दोघे आरोपी जेरबंद

नगर – कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वलर्स फोडून दुकान मालक शाम धाडगे यांची हत्याकरून सोन्याचे दागिने लुटणारे दोन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. श्रीमंत ईश्‍वर काळे (वय-45, रा. मिटमीटा, औरंगाबाद, प्रिया जीतू भोसले, (वय-30, रा. जोगेश्‍वरी, वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार श्रीमंत काळे व प्रिया भोसले ह्या औरंगाबाद येथील मिटमिटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे रोहन खंडागळे, सोन्याबापू नानेकर, मल्लिकार्जून बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपूते, सोनाली साठे, बबन बेरड यांचेसह औरंगाबाद शहर स्थानिक गुन्हे शाखेचे क्राईम युनिट क्रं. 1 चे पोलीस निरीक्षक मधूकर सावंत, अमोल देशमूख, योगेश धांडे, विजय पवार यांनी सापळा रचवून आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासाकामी कोपरगाव पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पुढील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत. श्रीमंत ईश्‍वर काळे हा पपड्या काळेचा चुलत भाऊ असून पपड्या काळे याचे टोळीतील प्रमूख साथीदार आहे. कोळपेवाडी येथील 19 ऑगस्ट 2018 मध्ये लक्ष्मी ज्वेलर्समध्ये दरोडा टाकून दुकाण मालक शाम धाडगे यांची गोळ्या घालून हत्या केली होती. गणेश धाडगे यांना जखमी करून आरोपींनी सोन्याचे दागिने लुटुन नेले होते. यातील पपड्या उर्फ तुकाराम चव्हाण, वय-55, रा. सुदर्शननगर, वर्धा) याचेसह टोळीतील 16 आरोपी व सोने विकत घेणारे 3 सराफ असे 19 आरोपी अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.