लातूरमधील गंभीर गुन्हयातील दोघे आरोपी ‘जेरबंद’

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पुणे – लातूरमध्ये खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करुन फरार झालेल्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. गुन्हा केल्यापासून दोघेही आरोपी फरार होते. अमोल ज्योतिराम गंभीरे(26,रा.सिंकंदरपुर लातुर ) व प्रतिक अंतराम माने(23,रा.माताजीनगर, लातुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना लातुर येथील गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी नऱ्हे येथे नवले रुग्णालयाजवळ थांबले असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी लातुर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात फरार असल्याचे सांगितले.

त्यानूसार त्यांना लातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, अमोल पवार, सचिन जाधव, इम्रान शेख, शशीकांत दरेकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.