पुणे – राजगुरुनगर शहरात वर्चस्व वादा मुळे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून कुख्यात गुंड पप्पु उर्फ राहुल कल्याण वाडेकर वय २९ वर्षे रा. थिगळस्थळ, राजगुरुनगर येथे याचा दि. १२/०७/२०२१ रोजी पहाटेच्या वेळी निर्घुणपणे खुन झाला. पप्पु उर्फ राहुल वाडेकर यांचे मिलींद जगदाळे, मयुर जगदाळे, बंटी जगदाळे, सचिन पाटणे, मारुती थिगळे सर्व रा. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांचेसोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून मिलींद जगदाळे, मयुर जगदाळे, बंटी जगदाळे, सचिन पाटणे, मारुती थिगळे, तौफिक शेख सर्व रा. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने पप्पु उर्फ राहुल वाडेकर याचेवर होलेवाडी परिसरात पिस्तुलातून गोळी फायर केली व कोयत्याने वार करून तसेच दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून करून पळुन गेले असलेबाबत मयत पप्पु वाडेकर याचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांनी खेड पोलीस स्टेशनला दि. १२/०७/२०२१ रोजी फिर्याद वरील सर्वांविरोधात फिर्याद नोंदविली आहे.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून .पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख . यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. यांना योग्य त्या सुचना करून अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. लंभाते यांचे मागदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक हे राजगुरुनगर परीसरात तपास करत असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे हा गुन्हा केलेपासुन फरारी आहे व तो पुणे बाजुकडे पळुन जाणेचे तयारीत आहे. अशी बातमी मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांनी तपास पथकासह बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे यास सापळा रचुन राजगुरुनगर शहरातुन ताब्यात घेतला असता त्यासोबत एक इसम मिळून आला त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे, वय – ३१ वर्षे, सध्या रा. तिन्हेवाडी रोड, जयगणेश दर्पन सोसायटी, डी. विंग, पहीला मजला फ्लॅट नं. १०४, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे असे सांगितले. त्यादरम्यान बंटी उर्फ विजय जगदाळे याचेकडे चौकशी केली असता, जितेंद्र गोपाळे हा देखील गुन्हा करतेवेळी सोबत होता व त्यानंतर जितेंद्र गोपाळे हा आरोपी नामे तौफिक शेख व मयुर जगदाळे यांचेसह पळून गेला होता. असे सांगितले. बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे व जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे यांना पुढील कार्यवाही कामी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केली.