ट्विटरची मालकी घेतल्यापासून एलॉन मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपात करणे, ब्लू टिक बाबतचे निर्णय यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. मात्र आता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा लोगोच बदलून टाकला आहे.
अनेक वर्षांपासून ट्विटरची ओळख असलेला ब्ल्यू बर्ड बदलण्यात आला आहे. त्याऐवजी आता ट्विटरचा Doge नवा लोगो दिसत आहे. सुरुवातीला हे पाहून अनेकजण हैराण झाले होते. मात्र काही वेळातच एलॉन मस्क यांनी याबाबत माहिती देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
यासंदर्भात एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स तपासणारा एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी दिसत आहे. यात त्यांनी ट्विटरच्या ब्लू-बर्डचे आयडी कार्ड हातात धरल्याचे दिसते. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तेव्हा त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला ‘ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे,’ असे तो Doge सांगतो.
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
केवळ ट्विटरचे होम बटण असणाऱ्या ठिकाणी ब्लू बर्डऐवजी डॉगचे चित्र दिसत आहे. म्हणजे हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर दिसत आहे. तर युजर्सना ट्विटर मोबाईल ॲपवर ब्लू बर्ड दिसत आहे. दरम्यान, डॉज इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये क्रिप्टोकरन्सीचे समोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात करण्यात आले होते.