मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या एका डिझायनरच्या विरोधात तक्रार दाखल केला आहे. तिला अटकही करण्यात आली आहे. अमृता फडणवीस मागच्या दीड वर्षापेक्षा जास्त काळ अमृता फडणवीस या अनिक्षाला ओळखतात. अमृता फडणवीस यांच्या घरीही अनिक्षा गेली होती.अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तसेच तिचा भाऊ अक्षय जयसिंघानीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप पक्षावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.
दरम्यान याच प्रकरणावरून अमृता फडणवीस आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यामध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणाच्या प्रश्च उपस्थित केले. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांना उत्तर दे म्हटलं, “मॅडम चतुर्वेदी, तुम्ही याआधी मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. जिथे मला अॅक्सिस बँकेकडून काही चुकीचे फायदे मिळाल्याचे सांगण्यात आले होते. आता तुम्ही माझ्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह लावत आहात. तसे तर एखाद्याने जर तुमचा विश्वास जिंकला आणि केस बंद करण्यासाठी तुम्हाला लाच दिली, तर तुम्ही तुमच्या मास्टरद्वारे अशा व्यक्तीला नक्कीच मदत कराल. ही तुमची औकात आहे.’
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदीने ट्विट केलं की,’माझ्यावर देवाची इतकी कृपा आहे की मला माझी औकात दाखवण्यासाठी कोणत्याही डिझायनरकडून कपडे घ्यावे लागत नाही ज्यामुळे मला नंतर अडचणीत यावे लागेल. मला समजत नाहीये की स्वतंत्र चौकशीने तुम्ही इतके अस्वस्थ का झाला आहात. तुम्ही तर त्याच दिवशी तक्रार करायला हवी होती ज्यादिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या होत्या.’ असं म्हणत टीका केली आहे,