माइक्रो ब्लाॅगिंग साईट टविटरने आपल्या यूजर्ससाठी एक खास नवीन फीचर लाॅन्च केले आहे.ज्याचे नाव आहे व्हॉइस रेकॉर्ड फिचर. यूजर्स या फीचर व्दारे आपला आवाज रेकॉर्ड करून ट्विट करू शकणार आहे. त्यामुळे यूजर्सचा वेळ वाचणार आहे. दरम्यान, सध्या कंपनीने हे फिचर फक्त आयओएस यूजर्ससाठी लाॅन्च केलं आहे त्यामुळे अँड्रॉइड यूजर्सला त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
ट्विटरचे व्हाॅइस फीचर..
कंपनी याबाबत ट्विट करताना म्हटले आहे की, आम्ही सध्या व्हाॅइस फीचर हे फक्त आयओएस (iOS ) यूजर्ससाठी लाॅन्च केले आहे. यूजर्स 140 सेंकद पर्यंत आवाज (व्हाॅइस) रेकॉर्ड करून ट्विट करू शकतात. याशिवाय या ट्विटमध्ये एक व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे, ज्यामध्ये हे फीचर कसे काम करते याबाबत माहिती दिली आहे.
You can Tweet a Tweet. But now you can Tweet your voice!
Rolling out today on iOS, you can now record and Tweet with audio. pic.twitter.com/jezRmh1dkD
— Twitter (@Twitter) June 17, 2020
कसं वापराल हे नवीन व्हाॅइस फीचर…
ट्विटव्दारे पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार, जर तुम्ही तुमच्या आवाजात टविट करू ईच्छिता तर सर्व प्रथम न्यू पोस्ट वर टॅप करा. तिथे कॅमेऱ्याच्या बाजूला तुम्हाला आॅडिओ रेकाॅर्ड हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा आणि आवाज रेकॉर्ड करा. त्यानंतर डन बटणावर टॅप केल्यास तुमचे रेकॉर्ड केलेले ट्विट शेअर होईल.
Tweets with audio are rolling out on iOS and we only have one thing to say about it pic.twitter.com/CZvQC1fo1W
— Twitter (@Twitter) June 17, 2020
तसेच तुम्ही व्हॉइस ट्विट फीचरमध्ये व्हॉइस नोटला नेहमीच्या टेक्स्ट ट्विटसोबत अॅड करून देखील ट्विट करू शकता. म्हणजे एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट दोन्ही वापरता येईल.