मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर अनेक दिवसांपासून डिसलाइक बटणाबाबत बोलत आहे, पण आता कंपनीने याकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे दिसते. असे वृत्त आहे की ट्विटर एका नवीन फीचरची चाचणी करत आहे जे रिऍक्ट फीचर असेल. रिअक्शन फीचरसह, ट्विटर वापरकर्त्यांना नापसंतीचा पर्याय मिळेल ज्याला ‘डाऊनव्होट्स’ असे नाव दिले जाईल. या फीचरची सध्या iOS च्या बीटा व्हर्जनवर चाचणी सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार, ट्विटरने यावर्षी अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. आता कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. रिऍक्शन फीचरसह चार पर्याय उपलब्ध असतील, ज्यात टिअर्स ऑफ जॉय, थिंकिंग फेस, क्लॅपिंग हँड्स आणि क्रायिंग फेस यांचा समावेश आहे. ट्विटर डाउनव्होट्स (नापसंत) डेटा देखील संग्रहित करेल असेही बोलले जात आहे. लाइक बटणापूर्वी डाऊनवोट्सचा पर्याय उपलब्ध असेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नापसंतीची संख्या सार्वजनिक केली जाणार नाही.
ट्विटरने अलीकडे एक टिपिंग फिचर आणले आहे ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटरला पैसे पाठवता येतात. हे फिचर सध्या फक्त अँड्रॉइड डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. ट्विटरने या वर्षाच्या सुरुवातीला टिप जार हे फिचर सादर केले.
ट्विटरचे टिप जार हा त्याच्या कमाईचा एक भाग होता. तुम्ही देखील निर्माता असाल तर तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये बँडकॅम्प (Bandcamp), कॅश ऍप (Cash App), पॅट्रिऑन (Patreon), पे पाल (Paypal) आणि वेनमो (Venmo) खाती जोडू शकता. यानंतर प्रोफाईलमध्ये टिप जार आयकॉन दिसेल.