टिव्‌टरचे सीईओ, अधिकाऱ्यांचा हजर राहण्यास नकार

नवी दिल्ली – संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीसमोर हजर होण्यासाठी टिव्‌टरचे सीईओ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला आहे, अशी माहिती माहिती-तंत्रज्ञान समितीने दिली. सोशल मीडियावर नागरिकांचे अधिकार सुरक्षित राखण्याच्या मुद्यावर त्यांना समन्स बजावले होते.

भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने एक फेब्रुवारीला अधिकृत पत्राद्वारे टिव्‌टरचे सीईओ आणि अधिकाऱ्यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. ही बैठक सात फेब्रुवारीला संसदीय समितीची नियोजित होती. पण टिव्‌टरचे सीईओ जॅक डॉर्सी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणखी वेळ देण्यासाठी आता 11 फेब्रुवारीवाला ही बैठक होणार आहे.

माहिती-तंत्रज्ञान समितीकडून टिव्‌टरला पाठवण्यात आलेल्या पत्रात संस्थेच्या प्रमुखाला समितीसमोर हजर रहावे लागेल. तसेच प्रमुखासोबत अन्य प्रतिनिधींनी हजर राहावे, असे या पत्रात म्हटले आहे. नागरिकांच्या डाटाची सुरक्षितता आणि सोशल मीडियावरुन निवडणुकीत हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)