मुंबई : जगात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला असताना दुसरीकडे हॅकर्सने ट्विटरवर मोठा हल्ला केला आहे. जगभरातील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक्स करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
उद्योजक अॅलन मस्क, जेफ बेजोस आणि बिल गेट्स यांच्यासह जगभरातील अनेक मोठ्या उद्योजकांचेही ट्विटर अकाऊंट्स हॅक करण्यात आले आहेत.
हॅक केलेल्या प्रत्येक अकाऊंटवरुन एकसारखे ट्वीट केले होते. बिटकॉईनद्वारे पैसे पाठवा आणि तुम्हा दुप्पट पैसे देऊ. आता वेळ आलीय की आम्ही समाजातून जे कमावले ते परत करण्याची, असेही या ट्वीटमध्ये लिहिले होते. विशेष म्हणजे हॅकिंगचा प्रकार लक्षात येईपर्यंत शेकडो लोकांनी एक लाखांमध्ये जास्त डॉलर पाठवले होते. पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच हे ट्वीट डिलीटही झाले. या सगळ्या प्रकारावर ट्विटरने म्हटलं आहे की हा काळ आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. हे सगळं पूर्ववत करण्यासाठी आमची टीम अथक मेहनत करत आहे.
We also limited functionality for a much larger group of accounts, like all verified accounts (even those with no evidence of being compromised), while we continue to fully investigate this.
— Twitter Support (@TwitterSupport) July 16, 2020
ट्विटरचे सीईओ जॅक या संपूर्ण प्रकरणावर म्हणाले आजचा दिवस ट्विटरसाठ अतिशय कठीण होता, आम्ही हॅकिंग रोखण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अनेक अकाऊंट्स बंदही केले होते, जे आता पुन्हा सुरु केले आहेत. ही हॅकिंग कशी झाली आणि यामागे कोण होतं याचा तपास सुरु आहे.