नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून Twitter ने आपल्या पोर्टलमध्ये अनेक नव-नवीन बदल केल्याचे दिसून आले आहे. त्यात आता ट्विटरने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स ट्विटर बंद करणार आहे. तसेच, इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्विटरकडून पाठवण्यात येत आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास ट्विटर त्यांचे अकाउंट बंद करणार आहे.
यामुळे युजर्सना अचूक, विश्वासार्ह माहिती मिळेल आणि ट्वीटरवरील त्यांचा विश्वास वाढेल. २०२० मध्ये ट्विटर आपल्या युजर्सला नवीन सेवा देण्यासाठी आपल्या पोर्टलमध्ये आणखी आधुनिक फीचर्स आणणार असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलेले आहे. असं ट्वीटरच्या प्रवक्त्यानं म्हंटल आहे.