नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकौंट काही काळासाठी हॅक करण्यात आल्याचा प्रकार आज घडला. परंतु थोड्याचवेळात हे खाते पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे.
हॅकरने हे खाते हॅक करून त्याचे नामांतरही केलेले आढळले. या खात्याला इलॉन मस्क असे नाव देण्यात आले होते. हॅकर्सनही यावर काही मेसेजही टाईप करून पोस्ट केलेले आढळले. तसेच या खात्यावरून अन्य काही लिंकही शेअर करण्यात आल्या होत्या.
तो सर्व तपशील नंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने डिलिट करून टाकला. आज सकाळी दहा वाजून अकरा मिनीटांनी हे खाते हॅक करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे केंद्र सरकारचे महत्वाचे खाते मानले जाते. सर्व अधिकृत सरकारी माहिती या ट्विटर अकौंटवरून दिली जाते.