“ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’मध्ये ट्‌विस्ट

‘ये रिश्‍ता क्‍या कहलाता है’मध्ये सध्या मोठा बदल होतो आहे. वेदिका आणि कार्तिकचा साखरपुडा लवकरच होणार आहे. तर दुसरीकडे नायराला कायरवच्या हृदयला छिद्र असल्याचे तथ्यही समजले आहे. एखाद्या परक्‍या मुलावर एवढे प्रेम करणे योग्य नाही, असे दादी कार्तिकला समजावणार आहे. कार्तिकला दादीचे म्हणणे पटते आणि तो तिला आश्‍वासनही देतो. मात्र कायरवशी त्याचा काही तरी घनिष्ठ संबंध आहे, हेच त्याला जाणवत असते. वेदिका-कार्तिकने दादीसाठी जो सोन्याचा दागिना बनवला असतो, तो कायरवच्या घड्याळात अडकतो. कायरवच्या हातून गुन्हा झाल्याची सर्वांची भावना होते. पण नायरा देवाकडे कायरवच्यावतीने माफीही मागते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.