काद्यांच्या दरावरून ट्विंकल खन्नाने घेतली फिरकी

बॉलिवुडमधील सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्‌विंकल खन्ना सध्या आपल्या ब्लॉग्स आणि पुस्तकांमुळे सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. ट्‌विंकल खन्ना सद्य परिस्थिती, राजकिय आणि सामाजिक घडामोडीवर टिपण्णी करत आलोचना करत असते. त्यातच ट्‌विंकलने नुकताच असा एक ब्लॉक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या देशात काद्यांचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. यावरून लोकसभेतही चांगलेच राजकारण सुरू आहे. याविषयी ट्विंकलने आपल्या ट्विटरवर ब्लॉगला शेअर करत वाढलेल्या कांद्याच्या दराची तुलना महागड्या फळांशी केली आहे.

एका संकेतस्थळासाठी लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये ट्विंकलने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या संसदेतील विधानावरून चिमटा काढला आहे. तिने लिहिले की, आभारी आहे की, निर्मला यांनी फ्रान्सची महाराणी मॅरी अंतोनेप्रमाणे “कांदा नाही तर कांदा भजी खा’ असे म्हटले नाही.

ट्‌विंकल ऐवढ्यावरच थांबली नाही तर तिने ब्लॉगमध्ये गुगलवरून 5 अशा रेसिपी शेअर केल्या आहेत ज्या बिना कांदा तयार केल्या जातात. या रेसिपीमध्ये पाव भाजी, चिकन करी, राजमा, वांग्याचे भरीत आणि मटण कीमा आदीचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.