मुंबई – बॉलिवुडमधील सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सध्या आपल्या ब्लॉग्स आणि पुस्तकांमुळे सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. ट्विंकल खन्ना सद्य परिस्थिती, राजकिय आणि सामाजिक घडामोडीवर टिपण्णी करत आलोचना करत असते.
यातच काही दिवसांपूर्वी ट्विंकलने काद्यांचे वाढलेले दर बाबत एक ब्लॉग लिहला होता. एकीकडे तिच्या ब्लॉगमुळे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असतांना पुन्हा एकदा कांद्यामुळे ती चर्चेत आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पती अक्षय कुमारने ट्विंकला कांद्याचे झुमके तिला भेट म्हणून दिले होते. त्यानंतर ट्विंकलने हे झुमके कानात घालून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने हे झुमके कानात घातलेले दिसत आहेत.
‘एका शूटनंतर दुसरे शूट… पण तू ही मौल्यवान भेटवस्तू माझ्यासाठी आणलीस, त्याचा मला आनंद आहे. असे तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.