Commonwealth Chess Championships 2024 :- भारताच्या शुभी गुप्ताने श्रीलंका येथील कालूतारा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या 16 वर्षांखालील गटात सुवर्ण तर 20 वर्षांखालील गटात कांस्य कामगिरी करताना दुहेरी यश मिळविले.
महिला फिडे मास्टर व मुलींची 19 वर्षाखालील गटाची राष्ट्रीय विजेती असलेया शुभीने या स्पर्धेच्या 16 वर्षांखाली गटात चमकदार कामगिरी केली. 16 वर्षांखाली गटात खेळताना शुभीने 7 लढती जिंकल्या तर 2 लढती अनिर्णित राहिल्या. त्यामुळे शुभीला या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला नाही. शुभीने 9 पैकी 8 गुणांची कमाई करताना शानदार कामगिरी केली.
शुभी हिने खुल्या गटामध्ये देखील अनुभवी ग्रँडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स आणि महिला ग्रँडमास्टर्स यांच्या विरोधात दमदार कामगिरी केली आहे. शुभीने मुलींच्या 20 वर्षांखालील गटात देखील 4.5 गुणांची कमाई करताना कांस्य पदक मिळविले.
अग्रमानांकित खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मला मिळाला. दोन्ही गटामध्ये झालेल्या कामगिरीने नवीन आत्मविश्वास मिळाला असल्याचे शुभीने सांगितले.