बारणे क्रिकेट अकादमी संघाचा विजय

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे -साखळी फेरीत विनय कसाळे ( 13 धावा व 3-14) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बारणे क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा 25 धावांनी पराभव करत येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शानदार सुरुवात केली.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा खेळताना बारणे क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 109 धावा केल्या. यात विश्‍वजीत फेगडे 28, गणेश काळेल 18, विनय कसाळे 13 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. व्हिजन संघाकडून संस्कृत गायकवाडने 12 धावात 3 गडी बाद केले.

या आव्हानाला सामोरे जाताना बारणे क्रिकेट अकादमीच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे व्हिजन क्रिकेट अकादमी संघ 19.5षटकात 84धावावर आटोपला. यात मल्लिका प्रकाश शेट्टीने सर्वाधिक 21धावा केल्या. बारणे क्रिकेट अकादमी संघाकडून विनय कसाळे(3-14), अथर्व चौधरी(2-9), शर्विल काळे(2-8), राजप्रतिम दान(1-3) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी विनय कसाळे ठरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.