अमेरिकेतून हरियाणात परतलेल्या 22 जणांना करोनाची लागण

चंडीगढ -अमेरिकेने अलीकडेच आपल्या भूमीत अवैध शिरकाव केलेल्या भारतीयांच्या एका गटाचे प्रत्यार्पण केले. त्यामध्ये हरियाणातील 76 रहिवाशांचा समावेश होता. त्यातील 22 जणांना करोनाची लागण झाली आहे.

मेक्‍सिकोलगत असणाऱ्या सीमेतून काही भारतीयांनी अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांना अवैध प्रवेशाबद्दल अमेरिकी यंत्रणांनी अटक केली. त्यातील 160 भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले. त्यांना घेऊन विशेष विमान चालू आठवड्याच्या प्रारंभी पंजाबच्या अमृतसरमध्ये दाखल झाले. त्यातील 76 जण हरियाणाचे रहिवाशी आहेत.

हरियाणात परतल्यानंतर त्यांची करोनाविषयक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्यांना पुढील उपचारासाठी पंचकुलामधील रुग्णालयात हलवण्यात आले. तर अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. हरियाणातील करोनाबाधितांच्या संख्येने याआधीच 1 हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील 700 हून अधिक बाधित करोनामुक्‍त झाले आहेत. त्या राज्यात करोना संसर्गाने आतापर्यंत 16 बाधितांचा बळी घेतला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×