पुढील वर्षभरात वीस शासकीय सुट्ट्या

रविवार आल्याने चार सुट्ट्या वाया

पिंपरी – केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सन 2020 या वर्षात राज्य सरकारकडून 20 सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनासह चार सुट्ट्या रविवारी येत असल्याने हक्काचा चार सुट्ट्य वाया गेल्या आहेत. तर उर्वरित 20 सुट्ट्यांचे दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक पाच सुट्ट्या असणार आहे.

जानेवारी महिन्यात येणारा प्रजासत्ताक दिन रविवारी येत आहे. याव्यतिरिक्त एकही सार्वजनिक सुट्टी या महिन्यामध्ये नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दि. 19) व महाशिवरात्री (दि. 21) या दोन दिवशी सुट्टी असणार आहे. मार्च महिन्यामध्ये होळीचा दुसरा दिवस (दि. 10) व मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुडीपाढवा (दि. 25) या दोन सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत.

एप्रिल महिन्यामध्ये रामनवमी (दि. 2), महावीर जयंती (दि. 6), गुडफ्रायडे (दि. 10) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (दि.14) हे चार दिवस सुट्टी राहिल. मे महिन्यात महाराष्ट्र दिन (दि. 1), बुद्ध पौर्णिमा (दि. 7), रमजान ईद (दि. 25) अशा तीन सुट्ट्या देण्यात येणार आहेत. जून व जुलै या दोन महिन्यांत एकही सार्वजनिक सुट्टी आलेली नाही. ऑगस्ट महिन्यात बकरी ईद (दि. 1), स्वातंत्र्य दिन (दि.15), पारशी नववर्ष दिन (दि. 16), गणेश चतुर्थी (दि. 22) व मोहरम (दि.30) अशा पाच सुट्ट्या असणार आहेत. सप्टेंबर महिन्यात एकही सार्वजनिक सुट्टी नाही. ऑक्‍टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती (दि. 2), दसरा (दि. 25), ईद ए मिलाद (दि. 30) असे तीन दिवस सुट्टी राहिल. नोव्हेंबरमध्ये दिवाळी, लक्ष्मीपूजन (दि. 14), बलिप्रतिपदा (दि. 16) व गुरूनानक जयंती (दि. 30) अशा तीन सुट्ट्या आहेत. तर डिसेंबर महिन्यात ख्रिसमस (दि. 25) एक सार्वजनिक सुट्टी आहे.

चार सुट्ट्या रविवारी
प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम व दसरा या चार सुट्टया रविवारी येणार आहेत. ऑगस्ट महिन्यातील स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्ष दिन या सुट्ट्या जोडून असणार आहेत. बॅंकांना आपले वार्षिक लेख पूर्ण करण्यासाठी दि. 1 एप्रिल रोजी सुट्टी राहिल. मात्र या दिवशी फक्त बॅंका बंद राहतील. बाकी शासकीय कार्यालये नियमित वेळेत सुरू राहतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)