पिंपरी – बारा जणांच्या टोळक्याने तरुणास लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास देहूरोड येथे घडली. या प्रकरणी सचिन अशोक निकम (वय 31, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आकाश, सत्वेल चिन्नास्वामी, मदन चिन्नास्वामी ऊर्फ टोकल, चिंझी, शहेनशहा यांचा मुलगा आणि अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास बारा जणांचे टोळके सचिन यांच्या घरासमोर आले. त्यांनी सचिन यांना लोखंडी रॉड व पाईपने मारहाण केली. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.