मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.
http://mahresult.nic.in/ बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली.
यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.