Guri Dhairya Ki Love Story Series | TVF ची लोकप्रिय वेब सीरीज ‘अॅस्पिरंट्स’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 2021 मध्ये रिलीज झालेल्या या वेब सीरिजचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या सीरिजचा दुसरा सीझनही हिट झाला. त्यानंतर TVF कडून या सीरिजच्या स्पिन ऑफची घोषणा करण्यात आली आहे.
TVF आता गुरी आणि धैर्याची लव्ह स्टोरी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. टीव्हीएफने ‘गुरी धैर्या की लव स्टोरी’ या वेब सीरिजची घोषणा केली आहे. ‘अॅस्पिरंट्स’मध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या अभिलाष, गुरी आणि एसके या तीन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली होती. या पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर आता टीव्हीएफकडून या सीरिजचे स्पिन ऑफ प्रेक्षकांसाठी आणले जात आहेत.
View this post on Instagram
TVF ने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ‘अॅस्पिरंट्स’च्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली. ‘गुरी धैर्या की लव स्टोरी’ चे पोस्टर जारी करत फॅन्सला एक मोठे सरप्राइज दिले आहे. पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मैत्री ते कायमची साथ! गुरी आणि धैर्याची प्रेमकथा पाहा – ते कसे भेटले आणि कशी प्रेमाने मार्ग शोधला…लवकरच TVF च्या यूट्यूब चॅनलवर.’ या पोस्टरमध्ये गुरीच्या भूमिकेत शिवांकित सिंग परिहार आणि धैर्याच्या भूमिकेत नमिता हे पार्कमध्ये एका बेंचवर बसलेले दिसत आहेत.
गुरी आणि धैर्या या ‘अॅस्पिरंट्स’मधील ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘अॅस्पिरंट्स’च्या दोन्ही सीरिजमध्ये गुरी आणि धैर्याच्या केवळ लग्नाबाबत दाखवण्यात आले होते. मात्र, ते दोघे एकमेकांना पुन्हा कसे भेटले, लग्नाच्या बंधनात कसे अडकले, याबाबत दाखवण्यात आले नव्हते. मात्र, आता या स्पिन ऑफमध्ये त्यांच्या प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लवकरच ही नवीन सीरिज TVF कडून रिलीज केली जाणार आहे.
दरम्यान, याआधी ‘अॅस्पिरंट्स’मधील छोटेसे, पण महत्त्वाचे पात्र असलेल्या संदीप भैया वरील सीरिज रिलीज करण्यात आली आहे. अभिनेता सनी हिंदुजाने साकारलेले या पात्राला प्रेक्षकांचे जबरदस्त प्रेम मिळाले.