मुंबई – ‘पलक तिवारी’ हे नाव सध्या बॉलिवूडमध्ये चांगलच चर्चेत आहे. पलकने आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. श्वेता तिवारी हे नाव टीव्ही जगतात खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे पलकला देखील इंडस्ट्रीमध्ये अनेकजण ओळखतात. श्वेता आणि पलक या माय लेकीची जोडी सर्वांनाच आवडते. नुकताच पलकचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
पलक तिवारीने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पलक ऑटोच्या मागील सीटवर बसून पोज देताना दिसत आहे. यादरम्यान तिने काळ्या रंगाचा अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेससोबतचा तिचा पार्टी मेकअप तिला आणखीनच सुंदर बनवत आहे. पलकची ही स्टाईल चाहत्यांनी याआधी कधीच पहिली नव्हती. पलकचा हा निरागसपणा चाहत्यांना खूप आवडला आहे.
View this post on Instagram
पलक तिवारीच्या या फोटोवर चाहते खूप मजेशीर कमेंट करत आहेत. यावर एकाने कमेंट करत ‘आता मला ऑटो ड्रायव्हर व्हायचे आहे’ असे लिहिले. तर एकाने लिहिलं, ‘कुणी तरी फायर ब्रिगेडला फोन करा.’ अशा अनेक प्रतिक्रिया पलकच्या या फोटोवर येत आहेत. काहींनी तर तिला ऑटोमधून चाललीय एव्हढी गरिबी आली का असा सवाल केला आहे. ऑटो रिक्षामधील पलकचा हा साधा सिम्पल अंदाज चाहत्यांना चांगलाच रुचला आहे.