टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागीने केला साखरपुडा; शेअर केले खास फोटो

Roopal Tyagi | अभिनेत्री रुपल त्यागीला ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात तिने गुंजन नावाच्या भूमिका साकारली होती. मात्र यानंतर ती लाईमलाईटमध्ये दूर राहिली, याच दरम्यान आता रुपल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपल हिने गुपचूप साखरपुडा उरकला असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रुपल हिने बॉयफ्रेंड नोमिश भारव्दाजसोबत साखरपुडा केला आहे. नोमिशनं गोव्यात रूपलला प्रपोज केलं. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फोटो पोस्ट करत रुपल हिने YES… म्हणत नोमिश याला लग्नासाठी होकार दिला आहे. Roopal Tyagi |
View this post on Instagram
रूपलनं एका मुलाखतीत सांगितलं की, ‘नोमिशसोबत तीची ओळख एका कॉमन मित्रामुळं झाली. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हाचवाटलं की हाच तो माणूस आहे ज्याच्यासोबत आयुष्य घालवणार आहे.’ नोमिश मुंबईचा असून सध्या लॉस एंजेलिसमध्ये काम करतो. दरम्यान, रुपल आणि नोमिश 5 डिसेंबर 2025 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. Roopal Tyagi |
रुपल त्यागी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘कसम से’, ‘एक नई छोटी सी जिंदगी’, ‘हमारी बेटियों का विवाह’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘झलक दिखला जा’, ‘बिग बॉस सीझन 9’मध्ये देखील दिसली. Roopal Tyagi |
हेही वाचा :
विरोधकांच्या टीकेनंतर भाजपचा यू-टर्न! पक्षप्रवेशाला स्थगिती मिळताच काशिनाथ चौधरींना अश्रु अनावर





