श्रुतिका मांजरेकर, मुंबई
गुगल मॅप्सच्या लोकल गाईडसच्या समूहासाठी आनंदाची बातमी म्हणजे, लोकल गाईडस कनेक्टचे पहिले भारतीय मॉडरेटर म्हणून, मूळचे पुण्याचे आणि सध्या दिल्लीमध्ये असलेले तुषार सुराडकर यांची नियुक्ती झाली आहे. देशातील विद्यमान लोकल गाईड्सना मार्गदर्शन करणे आणि गुगल मॅप्स जास्तीत जास्त लोकांना वापरायला उद्युक्त करणे, हे त्यांचे मुख्य काम असेल.
आपण गुगल मॅप्स हे ऍप त्यामानाने कमीच वापरतो. मात्र, टॅक्सी कंपनीजचे ड्रायव्हर्स, ऑनलाईन फूड पार्सल अथवा शॉपिंगचे पार्सल पोहोचवणारे डिलिव्हरी बॉईज यांच्यासारख्यांना गुगल मॅप्स हे ऍप अतिशय उपयोगाचे ठरते. याच गुगल मॅप्स ऍपमध्ये आपण आपल्या फोनमध्ये लोकेशन सेटींग सतत सुरु ठेवले असता, तुम्हाला लोकल गाईड अर्थात स्थानिक मार्गदर्शक बनण्याची संधी असते.
आपण दिवसभर जो काही प्रवास करतो, जिथे कुठे भेटी देतो, त्या सर्वांची टाईमलाईन गुगल मॅप्स रेकॉर्ड करतोच. शिवाय आपण काढलेल्या फोटोजना/व्हिडीओजना गुगल मॅप्सवर शेअर करण्याची संधीही असते. मॅप्सवर जर एखाद्या ठिकाणाची, रस्त्याची चुकीची नोंद असेल, तर ती लोकल गाईडसना दुरुस्तही करता येते. तसेच एखाद्या ठिकाणाचा रिव्ह्यु लिहिणे, मॅप्सकडून पोस्ट केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देणे, इतर युजर्सच्या पोस्टना उत्तरे देणे अशा विविध गोष्टींतून गुगल लोकल गाईडस अनेक पॉईंटस मिळवत पुढे जातात आणि एकेक लेव्हल पार केल्यानंतर अशा लोकल गाईडसना वेगवेगळे स्टार रेटींग मिळते. शिवाय मास्टर फोटोग्राफर, एक्सपर्ट फॅक्ट फाईंडर यासारखे किताबही गुगलकडून दिले जातात.
अनेकदा रेडबस किंवा ओयो हॉटेल्सची डिस्काऊंट कुपन्स, कधी 1 टीबी व्हर्च्युअल फ्री स्पेस मिळते तर कधी प्लेस्टोअरवर खर्च करण्यासाठी व्हाऊचर्सही मिळतात. शिवाय प्रतीवर्षी होत अमेरिकेत असलेल्या गुगल लोकल गाईडस कनेक्टच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी तुमची निवड झाली तर, तुमचा अमेरिकेला जाण्या-येण्याचा, तीन दिवस राहण्याचा सर्व खर्च, व्हिसा फीसह गुगल मॅप्सकडून केला जातो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मॅप्सकडून रोख रक्कम स्वरुपात पुरस्कार दिले जात नाहीत.
3 फेब्रवारी 2021 ला गुगल मॅप्स स्थानिक भारतीय मार्गदर्शकांना आनंदाची बातमी मिळाली की, त्यांच्या कनेक्ट संकेतस्थळा वर जेथे जागतीक पातळीवरील सर्व देशीय स्थानिक मार्गदर्शक सक्रिय असतात. या पूर्वी काही वर्षांपूर्वी भारतातून अनुराधा नावाच्या एक महिला मॉडरेटर होत्या, परंतु त्या काही कालावधी पुरत्याच गुगलच्या एका प्रोजेक्ट साठि कार्यरत होत्या. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर पहिला भारतीय “कनेक्ट मॉडरेटर (नियंत्रक)” निवडला गेला आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असे की तुषार सुराडकर हा एक मराठमोळा पुणेकर आहे.
गुगल लोकल गाईड
गुगल लोकल गाईडसचा जागतिक समुदाय आहे जो एखाद्या ठिकाणाविषयी रिव्ह्युज लिहितो, फोटो शेअर करतो, विविध प्रश्नांची उत्तरे देतो, नवीन ठिकाणे ऍड करतो किंवा चुकीच्या नोंदी दुरुस्त करतो आणि गुगल नकाशावर अचूक माहितीची खात्री करतो. प्रत्येक अँड्रॉइड युजर्सना गुगल नकाशावर आसपासच्या उपलब्ध असलेल्या ऑफएसही दिल्या जातात.
गुगल मॅप्स 80 हून अधिक देशांमध्ये आणि 40 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यात भारतातील मराठीसह अन्य दहा भाषांचा समावेश आहे. लोकल गाईड्स प्रोग्राम हा व्यवसायांसाठी नाही तर गुगल मॅप युजर्ससाठी आहे. त्यात लोकल गाईड्स ना कुठल्याही प्रकारचे आर्थिक योगदान व मूल्य नसते. लोकल गाईड बनण्यासाठी आपले वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे. गुगल मॅप्सवर आपल्या जवळच्या परिसरातील माहितीचे व फोटो व विडिओ स्वरूपात शेअर करुन गुगल स्थानिक मार्गदर्शक गुण मिळवतात. आपण देत असलेल्या प्रत्येक पोस्टला विशिष्ट गुण मिळतात आणि शेवटची पातळी 100000+ गुणांसह लेव्हल 10 येथे संपते.
स्थानिक मार्गदर्शक कनेक्ट : www.localguidesconnect.com
सर्व स्थानिक मार्गदर्शकांना सक्रिय राहण्यासाठी आणि त्यांचे अनुभव सांगण्यासाठी गुगल मॅपची एक जागतिक वेबसाइट आहे. येथे प्रत्येकजण आपला प्रवास अनुभव, गुगल मॅप बद्दल प्रश्न आणि उत्तरे मॅप बद्दल चर्चा, गुगल मॅपला अजून कसे समृद्ध करण्यासाठी नवनवीन युक्त्या आणि नवीन माहिती आणि तंत्रज्ञानाच्या लेख लिहून पोस्ट करतात.
कनेक्ट हा एक असा मंच आहे जो लोकल गाईड समुदायासाठी तयार केला आहे आणि सहकारी मार्गदर्शन एकमेकांना प्रवासा संबधीत कोठे जायचे, आपल्या जवळपासच्या किंवा आपण भेट दिलेल्या सुंदर जागेबद्दल आणि प्रवासात राहण्याची खाण्याची उत्तम सोय कुठे होईल, तसेच प्रवासात काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळता येतील, कमीतकमी खर्चात किती चांगला प्रवास अनुभव याबद्दल उत्तम निर्णय घेण्यास मदत करतात. फेसबुक ट्वीटर व्हाट्सअपसारखे हे एक संकेतस्थळ आहे जेथे लॉगिन करून आपण सहकारी लोकल गाईडसशी संवाद साधू शकता, टिपा आणि कल्पना शेअर करू शकता. तसेच अन्य श्रुत्गुगलर्सकडून माहिती व मार्गदर्शन प्राप्त करू शकता. हे फक्त आणि फक्त गुगलच्या मॅप स्थानिक मार्गदर्शकांचे गुगल मॅप टिमशी संवाद साधण्यासाठी बनवलेले एकमेव माध्यम आहे. आपल्याला कधी कनेक्टवर कशासाठीही मदतीची आवश्यकता असल्यास, इथले नियंत्रक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कायम तयार असतात.
कनेक्टवर नियंत्रकांचे दोन भिन्न कार्यसंघ आहेत
1. कनेक्ट मॉडरेटर आणि गुगल मॉडरेटर
2. कनेक्ट मॉडरेटर.
कनेक्ट मॉडरेटर हे तुमच्या-माझ्यासारखेच स्थानिक मार्गदर्शक आहेत. ते नियमितपणे कनेक्ट सक्रिय असल्याने व त्यांनी तिथे मांडलेली, मते, पोस्ट व इतर गोष्टी बाकीच्या लोकल गाईडसना खूप उपयोगी पडतात म्हणून त्यांच्या परवानगीने गुगल कनेक्ट त्यांना कनेक्ट मॉडरेटर घोषित करतात. ते इतर सदस्यांना तिथे सक्रिय होण्यास वेळोवेळी मदत करतात. त्यासाठी ते सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी मिळविलेले ज्ञान लागू व अनुभव वापरून इतरांना सुधारण्यात मदत करतात. ते नवीन लोकल गाईड्सचे स्वागत करताना, कार्यक्रमाचे स्पष्टीकरण देत, प्रश्नांची उत्तरे देतात आणि त्यांचे ज्ञान इतरांसह सामायिक करण्यास पाठबळ देतात.
लोकल गाईडस खालील मुद्दे पूर्ण करून लोकल गाईडस कनेक्ट प्रोग्रामचे नियंत्रक बनू शकतात
1. कमीत कमी स्तर (Level 5) चे स्थानिक मार्गदर्शक जे सक्रियपणे गुगल नकाशे आणि स्थानिक मार्गदर्शक कनेक्टमध्ये सतत सहयोग देतात.
2. ते एक मैत्रीपूर्ण आणि आदरणीय सदस्य असतात जे कनेक्टला एक स्वागतार्ह ठिकाण ठेवण्यास मदत करतात.
येथे जगातील विविध भागांमधून कनेक्ट पोर्टलवर काम करणारे सुमारे 38 कनेक्ट मॉडरेटर आहेत आणि ते बऱ्याचशा भाषा बोलतात.
गुगल मॉडरेटर
हे गुगलने स्वतः नियुक्त केलेले संघाचे सदस्य आहेत. ते कनेक्ट पोर्टलवरील कोणत्याही आव्हानांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकांना आणि नियंत्रकांना कनेक्ट करण्यात मदत करतात. सध्या कनेक्ट पोर्टलवर 11 भिन्न भाषा बोलणारे गूगल मॉडरेटर आहेत. लोकल गाईडसना जर गुगल कनेक्ट मॉडरेटर बनण्याची इच्छा असेल तर, गुगल कनेक्ट नियंत्रकांना अर्ज किंवा नामांकन प्रक्रिया नसते.