“तुर्रम खान’चे नाव बदलले

राजकुमार राव आणि नुसरत भरुचाचा लीड रोल असलेल्या “तुर्रम खान’चे शिर्षक आता बदलण्यात आले आहे. या कॉमेडी सिनेमाचे नाव आता “छलांग’ असे असणार आहे. हंसल मेहताचा हा सिनेमा एक सामाजिक प्रहसन असणार आहे. “ड्रीम गर्ल’ फेम नुसरत भरुचाने ट्विटरवरच्या पोस्टमधून या सिनेमाचे शिर्षक बदलल्याचे जाहीर केले आहे. “हीच टीम, हाच सिनेमा, हीच रिलीज डेट केवळ नवीन नाव “छलांग’.

आता 31 जानेवारी 2020 ला थिएटरमध्ये भेटू.’ असे तिने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने आपल्या या पोस्टबरोबर सिनेमाचे बदललेले पोस्टरही शेअर केले आहे. दिबाकर बॅनर्जीच्या 2010 मधील “लव्ह, सेक्‍स और धोका’मध्येही राजकुमार राव आणि नुसरत एकत्र होते.

त्यानंतर आता “छलांग’मध्ये दोघेही एकत्र येणार आहेत. अजय देवगण. लव्ह रंजन आणि अंकुर गर्गची निर्मिती असलेल्या “छलांग’हा राजकुमार राव आणि हंसल मेहता यांचा एकत्रित पाचवा सिनेमा असणार आहे.

हे दोघे यापूर्वी “शाहिद’, “सिटी लाईटस’, “अलिगड’ आणि “ओमेर्टा’ साठीही एकत्र काम केले होते. “छलांग’पुढच्या वर्षी जानेवारीत रिलीज होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.