अफगाणी निर्वसितांना रोखण्यासाठी तुर्की देश सीमेवर भिंत बांधणार

अंकारा – तालिबानी क्रूरतेमुळे अन्य देशांमध्ये विस्थापित होणाऱ्या अफगाणी शरणार्थ्यांना रोखण्यासाठी तुर्कीने सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 20 लाखांहून अधिक अफगाणांनी आधीच पाकिस्तान आणि इराणच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे परंतु या देशांनी आता त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत, पाकिस्तानने सीमा बंद केल्यामुळे आता या सीमाभागात अफगाणी निर्वासितांचे लोंढे अडकून पडले आहेत.

या शरणार्थ्यांना तातडीची मानवतावादी मदत देण्यासाठी पाकिस्तानने सीमा खुली करावी, असे आवाहन तालिबानच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानने कठोर भूमिका घेऊन सीमा बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान तालिबानी क्रूरतेच्याविरोधात जगभरातील अनेक देशांमधील अफगाणी नागरिकांनी तेथे तालिबानी राजवटीविरोधात निदर्शने करायला सुरुवात केली आहे. जर्मनी आणि भारतात राहणाऱ्या अफगाणांनीही स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि नागरी हक्कांसह महिलांच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे, या मागणीसाठी निदर्शने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.