तूर : एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञान

भारत हा कृषि प्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ ठेवण्यामध्ये कृषि क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. तूर हे भारताचे तसेच महाराष्ट्रातील एक महत्वाचे कडधान्य आहे. तुरीचे पिक देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले जाते. कडधान्य पिके हि प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत. अशा प्रकारे डाळीमधील प्रथिनांचे मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्व असून मानवाचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी फार उपयोगी आहेत.

सध्या तूर पिकाचे उत्पादन घेण्यासठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. सध्य स्थितीत तुरीचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण, उच्च गुणवत्ता असलेल्या सूधारित बियाण्याचा वापर, प्रति एकर योग्य झाडांची संख्या, योग्य लागवडीची पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण, एकात्मिक कीड व रोगांचे व्यवस्थापन तसेच योग्य साठवण तंत्रज्ञान यांचा एकात्मिक वापर करून तुरीचे उत्पादन वाढविणे सहज शक्‍य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करावा

क्षेत्र आणि उत्पादन :- तूर पिकविणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक असून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्यामध्ये कडधान्य पिकाखाली 32.75 लाख हेक्‍टर क्षेत्र असून, उत्पादन24.13 लाख टन आणि उत्पादकता 737 किलो प्रति हेक्‍टर आहे. तर देशामध्ये एकूण कडधान्य पिकाखालील क्षेत्र 234.70 लाख हेक्‍टर असून, त्यापासून 183.40 लाख टन उत्पादन मिळते आणि उत्पादकता 750 किलो प्रति हेक्‍टर अशी आहे.

तूर पिकाच्या कमी उत्पादकतेची करणे पुढीलप्रमाणे आहेत :-
1. कोरडवाहू क्षेत्रात तूर पिकाची लागवड. 2. हलक्‍या ते भारी जमिनीवर तूर पिकाची लागवड. 3. सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा कमी वापर. 4. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांचा अभाव. 5. बिजप्रक्रीयेसाठी योग्य जिवाणू खतांचा वापर न करणे तथा त्यांची अनुपलब्धता. 6. असंतुलित व अयोग्य खत व्यवस्थापन. 7. सिंचनाचा अभाव. 8. अयोग्य पिक संरक्षण पद्धती.

9. जमिनीच्या मगदुराप्रमाणे वाणांची लागवड न करणे. 10. जास्त पावसाच्या ठिकाणी अति संवेदनशील 11. पिकाची उंची जास्त असल्याने पिक संरक्षण करणे अवघड.

तरी वरील समस्यांचे निराकरण केल्यास तुरीचे उत्पादन वाढविणे सहज शक्‍य आहे. उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा सहज वाढू शकतो. तुरीची पाने जमिनीवर पडल्याने तसेच तुरीच्या मुळांवर असलेल्या गाठीतील जिवाणू हवेतील नत्र शोषून जमिनीस 60 ते 80 किलो पर्यंत उपलब्ध करून देतात.
तुरीपासून जास्तीचे उत्पादन मिळविण्यासाठी शास्राज्ञानी शोधलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा.

हवामान आणि जमीन :-

हवामान: तूर पिकांस 21 ते 24 अंश से. तापमान चांगले मानवते. भारी जमिनीत कमी पाण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त 30 ते 35 अंश से तापमानात सुद्धा तुरीचे चांगले पिक येते. तुरीचे पिक वार्षिक सरासरी 750 ते 1000 मि.मी. पावसात चांगले येते.

तूर पिकास पेरणीनंतर 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत नियमित पाऊस असणे फायद्याचे असते. जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवशयक आहे. तुरीस फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे व समशीतोष्ण हवामान आवश्‍यक आहे.

जमीन :- मध्यम ते भारी (35 ते 40 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुर पिकास उपयुक्त आहे. चोपण व पाणथळ जमिनीत तुरीचे पिक चांगले येत नाही. पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5. असावा. आम्लयुक्त जमिनीत पिकांच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्याने पिक पिवळे पडते. जमिनीत स्फुरद, कॅल्सियम तसेच गंधक या अन्नद्रयांची कमतरता नसेल अशी जमीन तुरीचे पिक घेण्यास निवडावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)