नवी दिल्ली- लोकांचा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा कल हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कमी खर्चात जास्त किलोमीटरचे अंतर कापायचे असेल तर भविष्यात इलेक्ट्रिक बाईक हा चांगला पर्याय असणार आहे. तसेच बाजारामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी नवनवीन इलेक्ट्रिक बाईक्स, स्कूटर्स आणण्यास सुरवात केली आहे. भारतातील नामांकित अश्या तुनवाल कंपनीने ‘तुनवाल स्टॉर्म ZX’ नावाचे इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल बाजारात आणले आहे. जाणून घेऊया त्या बद्दलची सविस्तर माहिती
‘हे’ आहेत तुनवाल स्टॉर्म ZX चे खास वैशिट्ये –
कंपनीकडून तुनवाल स्टॉर्म ZX या मॉडेलमध्ये 60V, 26Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला असून त्यामध्ये BLDC तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासांचा अवधी लागतो. रेंज आणि टॉप स्पीडच्या बाबतीमध्ये ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटर प्रति तासाच्या रेंजने 120 किलोमीटरपर्यंत धावते.
ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत. या ब्रेकिंग सिस्टीमसोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमही जोडण्यात आली आहे.
तसेच पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, ईबीएस, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर अश्या दर्जेदार फिचर्स व स्पेसिफिकेशन चा वापर देखील करण्यात आला आहे.