नागपूर – शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली आहे.
तुकाराम मुंढे यांनी करोना रुग्णांची भेट घेत प्रशासनाला ताबोडतोब आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी स्वतः पीपीई किट घालून आयसोलेशन वार्डात जाऊन रुग्णांशी संवाद साधला. येथील परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना सूचना व दिशानिर्देश दिले.
यावेळी तुकाराम मुंढे म्हणाले कि, रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. रुग्णांशी बातचित केली. डॉक्टरांशी चर्चा केली. अजून काय करायला हवे, यावर मंथन झाले. ते पुढे म्हणाले, फक्त आपल्या एका चुकीमुळे इतरांचे आयुष्य धोक्यात घालू नका. मास्कचा वापर असो, शारीरिक अंतराचे पालन असो, वाहनांसंदर्भातील नियम असो, या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर पुन्हा लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. म्हणून नियम पाळा आणि या शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी झटत असलेल्या मनपा प्रशासनाला साथ द्या, सहकार्य करा, असे आवाहनही नागपूरकरांना मुंढेंनी केले आहे.
https://www.facebook.com/ShriTukaramMundhe/posts/1990418171093038
दरम्यान, नागपुरात करोना बाधितांनी ३००० चा आकडा पार केला आहे.