नागपूर- नागपूरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपूर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहरातील बाजारपेठेची पाहणी केली. . कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यां व्यतिरिक्त शहरातील सर्व खाजगी आणि कॉर्पोरेट कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचं पालन करताना नागपूरकर दिसत आहेत. दरम्यान, रविवार, 22 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे किती लोक या कर्फ्यूची अंमलबजावणी करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.